भोर मधील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चे वतीने श्री नवनाथ महाराज लिमन यांच्या माऊली आधार अनाथाश्रम मधील मुलांना सोबत दिवाळी आणि भाऊबीज साजरी
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर : दिवाळी हा सण आनंदाचा… भरभराटीचा आणि उत्साहाचा. दिवाळी म्हटलं की कुटुंबात एकच जल्लोष असतो. लहान थोरांपासून सर्वांमध्येच एक चैतन्याचे वातावरण असते
दिपावली निमित्त सगळीकडे घरा घरात फराळ , लहान मोठे मुलांचे फटाके आवाज , आकाश कंदील व विद्युत रोषणाई, बाजारपेठ मध्ये कपडे , सोनं , नवीन वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसून येते.
भाऊबीज निमित्त बहीण भाऊला ओवाळून साजरी केली जाते.
मात्र ज्यांचे कुटुंबच नाही, त्यांची दिवाळी कशी असते? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचे उत्तर देता येणार नाही. कारण कुटुंबाशिवाय दिवाळी साजरी करण्याला अर्थच नाही. हीच पोकळी भरून काढण्यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यकर्ते उपक्रम राबवित असतात .
भोर मधील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चे वतीने ८०% सामाजिक व 20% अध्यात्म या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात
सामजिक बांधिलकी चे नात्याने नसरापूर माळेगांव येथील
श्री नवनाथ महाराज लिमन यांच्या माऊली आधार अनाथाश्रम मधील मुलांना सोबत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्यात आल्याचे स्वामी सेवेकरी संतोष कदम व अतुल धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी सर्व मुलांना भाऊबीज निमित्त ओवाळून मिठाई देऊन शुभेच्छा
स्वामी सेवेकरी सौ सोनाली कदम ,सौ भाग्यश्री धुमाळ, विजया कदम, परि मांढरे यांनी दिल्या.
माऊली आधार अनाथाश्रम चे
श्री शांताराम पिलावरे त्यांनी संस्थेच्या वतीने विद्यार्थीचा दिनक्रम संपूर्ण आश्रम ची माहिती देऊन सणासुदीच्या दिवसांत वेळात वेळ काढून सहपरिवार येऊन
आश्रमातील मुलांना सोबत भाऊबीज साजरी केल्याने मुलांना आनंद झाला तसेच हा उपक्रम राबविला बद्दल स्वामी समर्थ सेवा केंद्र चे अभिनंदन केले.
यावेळी मतदान जनजागृती बाबतचे माहिती देऊन मतदान जनजागृती करण्यात आली तसेच
माजी प्राचार्य
रोटरी क्लब चे सदस्य
सहारा पॅकेजींग कंपनी शिरवलचे चेअरमन
श्री रमेश बुदगुडे सर
यांनी वृक्षारोपण साठी आवळा बकुळा ची रोपं उपलब्ध करून दिली
त्यांचे विद्यार्थी कडून वृक्षारोपण करण्यात आले.
“आपल्या आनंदाचे क्षणी वाढदिवस प्रंसगी अनावश्यक खर्च टाळून माऊली आधार अनाथाश्रम मधील मुलांना सोबत साजरा करावेत असे आवाहन संतोष कदम यांनी सर्वांना केले.
भोर शहरातील आधारवड वॄध्दाश्रम येथील आजोबांना व
वनवासी कल्याण आश्रम मधील मुलांबरोबर भाऊबीज निमित्त ओवाळून शुभेच्छा दिल्या.


