कुलदीप कोंडे मंगळवारी भोर मध्येकरणार प्रचाराचा शुभारंभ!नारीशक्ती च्या वतीने “तात्यांना” भाऊरायांना भाऊबीज.


कार्यकारी संपादक : सागर खुडे

भोर,वेल्हे, राजगड मुळशी महिलांनी तात्यासाठी भाऊबीज आयोजित केली आहे.आणि तिथेच कुलदीप कोंडे आपल्या प्रचाराचा नारळ फोडुन दि. 5 नोव्हेंबर मंगळवार रोजी भोर येथे प्रचारास सुरूवात करणार आहे.महिला ह्यावेळचे इलेक्शन हातात घेणार आहे.सर्व महिला एकत्र येत स्वतः प्रचारत उतरले आहेत.अशी माहिती पूर्व भागातील राजापूर गावचे सुपुत्र हर्षद बोबडे सर आणि मा.सरपंच विकास चव्हाण यांनी दिली.

 

त्यामुळेच उद्या होणाऱ्या विधानसभेत आमदारकीसाठी कुलदीप कोंडे शिवाय पर्याय दिसत नसल्याचा महिला भगिनींचा ठाम विश्वास झाला आहे. मतदार संघात प्रत्येक गावात कुलदीप कोंडे यांनी महिलांसाठी कॅम्प चे आयोजन आयोजन करून महिला वर्गाचे काम सोपे केले. कॅम्पच्या माध्यमातून आधार कार्ड, लाडकी बहीण योजना, रेशनिंग कार्ड, मतदान कार्ड, दुरुस्ती अभियान राबवून तात्या घरोघरी पोहोचले.

ADVERTISEMENT

मतदारसंघात रस्ते पाणी वीज या मूलभूत गरजांसाठी तात्यांनी भरघोस निधी दिला. कोठेही न जाता गावागावात म्हणण्यापेक्षा घराघरात योजणा पोहचवल्या आणि घरबसल्या महिलांची कामे केली.त्यामुळे महिला म्हणत आहेत की असा आमदार हवा की तो कामे करणारा.असा भाऊराव हवा की तो पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा.हीच खरी भाऊबीज.आणि तिचं भाऊबीज आम्ही उद्या भोर येथे प्रचाराच्या निमित्ताने साजरी करणार आहोत.यामुळेच आता महिला वर्गांनी “तात्या आमदार” होणार हेच वाक्य वाडीवस्ती पासून भोर, राजगड,मुळशी तालुका पर्यंत नागरिक म्हणत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!