मांढर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिल्पा शिर्के बिनविरोध


[

मुख्य संपादक मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

मांढर ता.पुरंदर येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. वनिता पापळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत शिल्पा दत्तात्रय शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडी नंतर माजी आमदार संजय जगताप व तंटामुक्ती अध्यक्ष मा.दिपक पापळ यांच्या हस्ते नूतन सरपंच शिल्पा शिर्के व उपसरपंच मंगेश जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

 

बुधवार दि १६ एप्रिल रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत शिल्पा शिर्के यांचा एकमेव अर्ज आला. तथापी निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली सरतापे यांनी शिल्पा शिर्के या मांढर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक शशांक सावंत व तलाठी मेघा गवळी यांनी सहाय्य केले. शिल्पा शिर्के यांनी मांढर ग्रामस्थांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

ADVERTISEMENT

या निवडीबद्दल माजी आमदार संजय जगताप, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, मंडल अधिकारी रुपाली सरतापे यांनी अभिनंदन केले. या वेळी उपसरपंच मंगेश जगताप, माजी सरपंच वनिता पापळ, पूनम गाडे, माजी उपसरपंच किरण काशीद, ज्योती खोमणे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा शिर्के, तानाजी शिर्के सर, संतोष शिर्के, महादेव पापळ,सुरेश शिर्के, दत्तात्रय शिर्के, ज्ञानेश्वर शिर्के, राजेंद्र पापळ, रामदास पापळ, नवनाथ शिर्के, अनिल शिर्के, रजनी पापळ, दिपक पापळ, संपत पापळ, मनोज पापळ आदी सह महिला व ग्रामस्थ मोठा संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!