देशी दारुचे दुकान फोडणाऱ्या तडीपार गुंडाच्या मुसक्या वाई पोलिसांनी आवळल्या : ४८,०००/- रु. मुद्देमाल जप्त.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
वाई पोलीस ठाणे गु.र.नं ११०/२०२४ भा.द.वि.सं ४५४, ४५७,३८० प्रमाणे दि ०१ रोजी अज्ञात इसमाविरुध्द सरकारमान्य देशी दारुच्या दुकानात चोरी करण्याबाबत वाई पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सरकारमान्य देशी दारुच्या दुकानात चोरी करणारा इसम हा गुरेबाजार झोपडपट्टी येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या खास बातमीदारांमार्फत प्राप्त झाल्याने त्यांनी वाई पोलीस ठाण्याच्या तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांस सदर सराईत आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सुचित केल्याने तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी वाईमधील
गुरेबाजार झोपडपट्टी येथे सापळा रचुन सातारा जिल्ह्यातुन दोन वर्षोंसाठी तडीपार असणारा सराईत गुन्हेगार सारंग ज्ञानश्वर माने रा गुरेबाजार झोपडपट्टी वाई यांस ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदरच्या गुन्ह्याबाबत विचारपुस
केली असता त्याने सदरच्या सरकारमान्य देशी दारुच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिल्याने गुरेबाजार झोपडपट्टी मधील त्याचे राहते घराची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता,४८,०००/-रुपये किंमतीचे १५ देशी दारुचे बॉक्स तेथुन हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे वैभव पवार सहा पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.हवा अजित जाधव, उमेश गहीण, पो.ना धिरज कुंभार, राहुल भोईर पो.शि प्रसाद दुदुस्कर, राम कोळी, हेमंत
शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, धिरज नेवसे विशाल शिंदे, गोरख दाभाडे यांनी केली आहे.


