कामथडी–भोंगवली गटात भाजपकडून रोहन बाठे आघाडीवर! जिल्हा परिषदेसाठी प्रबळ दावेदार


मंगेश पवार

सारोळा : भोर तालुक्यातील कामथडी–भोंगवली जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाकडून माजी पंचायत समिती उपसभापती रोहन बाठे यांच्या उमेदवारीची चर्चा चांगलीच रंगली आहे. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाठे यांच्या नावावर पक्षात सकारात्मक चर्चा सुरू असून उमेदवारीचे प्रबळ संकेत मिळत आहेत. या घडामोडींमुळे स्थानिक राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा जल्लोष दिसून येतो आहे.

 

रोहन बाठे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांचा जनसंपर्क आणि विकासाभिमुख कार्यशैली ही त्यांची ओळख आहे. उपसभापती पदावर असताना त्यांनी गावागावात विकासकामांना गती देत पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, तसेच घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली. युवकांसाठी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, तसेच सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले.

ADVERTISEMENT

 

कोरोना काळात गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तसेच त्यांच्या अमृता उद्योग समूहाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार व उद्योजकतेची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे गटातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास, आपलेपणा आणि आदराचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

भाजपकडून त्यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त होत असून, स्थानिक युवक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाठे समर्थकांकडून गटात बॅनर, पोस्टर आणि सोशल मीडियावर प्रचाराची धूम सुरू झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!