डॉ ओमप्रकाश शेटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आयुष्यमान भारत समिती यांची जिल्ह्याधिकारी कार्यालय सातारा येथे सदिच्छा भेट
संपादक: दिलीप वाघमारे
“आरोग्य हेच राष्ट्रशक्तीचं खरे बळ आहे!”
सातारा जिल्ह्यातील आढावा बैठकीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
या बैठकीस जिल्हाधिकारी श्री. संतोषजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती यशनी नागराजन (CEO ZP), सौ प्रियाताई महेशजी शिंदे तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दि. १ एप्रिल २०२४ ते आजपर्यंत १०,६७१ लाभार्थ्यांवर उपचार/शस्त्रक्रिया करण्यात आली असून, एकूण २२ कोटी ४१ लाख रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
या यशस्वी कार्यामुळे आरोग्यविषयक न्याय अधिक वेगाने आणि प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे.
या दौऱ्याच्या निमित्ताने पत्रकार बांधवांशी संवाद साधून, योजनेची पारदर्शकता, प्रगती आणि भविष्यातील दिशा स्पष्ट करण्यात आली.
साताऱ्यातील जनतेसाठी ही योजना अधिक सक्षमपणे पोहोचवण्यासाठी मीडिया ही एक महत्त्वाची भागीदार संस्था ठरत आहे.
भारतचे यशवी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीने प्रेरित आरोग्य क्रांती आता महाराष्ट्रात वेग घेत आहे.
– डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे
(अध्यक्ष – आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र शासन)


