महावितरण विभाग भोर यांचे विरुद्ध भोर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनं.
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
गेली अनेक दिवस भोर तालुक्यामध्ये सातत्याने विजेचा लपंडाव होत असून तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्यां भेडसावित आहे,तसेच आधीच शेतकरी वर्गाला पावसाने तडी दिल्याने कामे टांगणीवर अडकलेली आहे आणि अशातच:शेतीपंपाच्या विजेची समस्स्या उद्भवल्यामुळे शेतीस पूरक अनेक छोटया मोठ्या व्यवसायिकांना विजेसंदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यामुळे त्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच अनेक नागरीकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे विजेच्या लपंडावामुळे, व्होल्टेज कमी जास्त होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
वरील अडचणी हया पावसाळया अगोदर अधिकारी वर्गाने योग्य त्या उपाय योजना न केल्याने होत आहेत. तसेच वारंवार विजेसंदर्भात अनेक पत्रकारांनी आपापल्या बातमिपत्रात हा मुद्दा सादर करूनही महावितरण कंपनीचे वरिष्ठ आधिकारी याकडे जाणूनबुजून काणाडोळा करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हा अडचणीप्रश्न निर्माण होत असताना त्या अडचणी सोडविण्यास प्रशासन कमी पडत आहे. सदरील अडचणी सोडविण्यास प्रचंड विलंब होत असून दिवसेंदिवस वीज,अती पाऊस, उच्च दाबाचे वारे अशी बनावटीची कारण सांगून संपूर्ण तालुका हा अंधारात राहत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
या सर्व गोष्टींना प्रशासन जबाबदार असुन मा. उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग भोर या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याची तत्काळ बदली करण्यात यावी,नाहीतर तालुक्यातील नागरीकांना होणाऱ्या त्रासाचा निषेध म्हणून पुणे जिल्हा युवक काँग्रेस तर्फे भोर तालुका युवक कॉग्रेस आणि तालुक्यांतील सामाजिक कार्यकर्ते तसेच पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे यांच्या वतीने सोमवार दि.२४/०६/२०२४ रोजी राजवाडा चौक भोर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले असून
सदरील आंदोलनामधुन उदभवणाऱ्या परीस्थितीस प्रशासन आणि महावितरण विभाग भोर हे दोन्ही सर्वस्वी जबाबदार असल्यामुळे विजेचा पुरवठा सुरळीत न झाल्यास त्वरीत अकार्यक्षम अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी,त्यांना बडतर्फ करण्याची मागणी प्रशासनाने करावी अशा पद्धतीचे पत्र प्रशासन दरबारी देत्ताना याप्रसंगी भोर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कऱण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोर खरेदी विक्री संचालक आणि सारोळे गावचे माजी उपसरपंच महेश धाडवे तसेच काँग्रेस पक्ष आणि भोर तालुक्यातील युतीमिञ पक्षातील कार्यकर्ते तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.