हरिचंद्री येथे बंद घर फोडून 4.60 लाखांचे दागिने लंपास


कापूरहोळ (प्रतिनिधी) – हरिचंद्री गावात बंद घराचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ₹4,60,800/- किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 247/2025 अन्वये भादंवि कलम 305, 331(3) नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी अमोल रामराव कदम (वय 32, रा. ग्रेस्टोन बिल्डिंग, हरिचंद्री, ता. भोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 22 जून 2025 रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 4.30 या वेळेत, त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून कपाटातील खालीलप्रमाणे मौल्यवान दागिने चोरून नेण्यात आले:

ADVERTISEMENT

सोन्याचे गंठण, कडे, अंगठ्या, लॉकेट-चेन, कानातील बाळ्या इत्यादी – ₹4,56,000/-

चांदीचे कमरदोरा व पायातील चैन – ₹4,800/-
एकूण अंदाजित मालमत्ता – ₹4,60,800/-

सदर घटनेची नोंद दि. 23 जून रोजी सायं. 5.12 वा. स्टेशन डायरी क्र. 16/25 नुसार करण्यात आली आहे.

याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी मयूर निंबाळकर करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!