अमरावतीत:- वडिलांना खावटी द्यावी लागल्याचा राग मनात; मुलाने केली वडिलांच्या हत्या, चांदूर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
संभाजी पुरीगोसावी ( अमरावती जिल्हा ) प्रतिनिधी. प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ हा आधारवड असतो. हा आधारवड चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी घेवुन आपल्या आयुष्याची संध्याकाळ सुखद राहावी यासाठी नेहमीच धडपड करीत असतो. मात्र अनेक कुटुंबात ज्येष्ठांना योग्य वागणूक मिळत नाही. शासनानेही देखील ज्येष्ठांसाठी कायदा केला आहे. त्याद्वारे ज्येष्ठांना अधिक खावटी मिळवण्याचा अधिकार आहे. मात्र तरीही जेष्ठांना होणारी परवड कायम आहे. अशातच एक अमरावती जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे जन्मदात्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केली आहे. ही घटना चांदूर बाजार पोलीस ठाणेच्या हद्दीतील पिंपरी पूर्णा येथे घडली आहे. माणिक यशवंतराव सोसे ( वय 75) रा. पिंपरी पूर्णा असे मृताचे नाव आहे. तर महेश माणिक सोसे (वय 40) असे आरोपी मुलाचे नाव आहे. चांदुर बाजार पोलीस ठाणेत याबाबत फिर्यादी गोपाळ माणिक सोसे यांनी त्यांच्या लहान भाऊ महेश माणिक सोसे याच्या विरोधात त्यांचे वडील माणिक सोसे यांनी न्यायालयात उदारनिर्वासाठी खावटीचे प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात दोघांनीही खावटीची रक्कम न भरल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात पकड वॉरंट काढला होता. त्यानंतर गोपाळ आणि महेश या दोन्ही भावांनी खावटीची रक्कम न्यायालयात भरली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून महेश यांनी संतापाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर पाईप ने वार केले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी महेश सोसे याच्यावर चांदूर बाजार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले वागवत नाही त्यांचे संगोपन करीत नाहीत अशांवर शासनाने अंकुश बसवावा यासाठी सन 2007 मध्ये ज्येष्ठ नागरिक कायद्याची निर्मिंती केली होती. आणि या कायद्याची सन 2010 पासून अंमलबजावणी झाली आहे. मात्र तरीही मुलाने न ऐकल्यास त्याला खावटी स्वरूपात ठराविक रक्कम द्यावीच लागणार आहे.

 
			
 
					 
							 
							