दिवळे ग्रामपंचायतीतील सदस्य अपात्र!


भोर तालुक्यातील दिवळे ग्रामपंचायत सदस्य श्रीम. विद्या गोविंद पांगारे यांना जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र हुडी (भा.प्र.से.) यांच्या न्यायालयाने अपात्र ठरविले आहे.

हा निर्णय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 10(1-अ) व कलम 16(2) अन्वये देण्यात आला आहे.

 

अर्जदार सोपान बबन बाठे, रा. दिवळे यांनी दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी दाखल केलेल्या विवाद अर्जामध्ये, सदस्य विद्या पांगारे यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्या अपात्र ठरवाव्यात अशी मागणी केली होती.

ADVERTISEMENT

 

प्रकरणी सर्व संबंधितांना नोटीसा देऊन सुनावणी घेण्यात आली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी पुणे यांनी दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी निकाल देत अर्जदाराचा अर्ज मान्य केला आहे.

 

त्यानुसार श्रीम. विद्या गोविंद पांगारे या ग्रामपंचायत दिवळे, ता. भोर, जि. पुणे येथील सदस्यपदावरून भूतलक्षी प्रभावाने दिनांक 11 जुलै 2024 पासून अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!