कापूरहोळ-नारायणपूर रस्त्यावर मोटारसायकल अपघात; पोलीस व उद्योजक आनंदशेठ दळवी यांच्या तत्परतेने तरुणाचा जीव वाचवला


दि. 1 नसरापूर :– कापूरहोळ-नारायनणपूर रोडवरील दिवळे गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी एक गंभीर अपघात घडला.

अपघातात सासवडकडे जात असलेली एम.एच. 23 झेड 2790 क्रमांकाची मोटारसायकल अचानक रस्त्यावर घसरली आणि त्यावरून जात असलेली गाडी जागीच पेटू लागली. अपघातात मोटारसायकलवरील चालक दत्ता मच्छिद्र नागरगोजे (रा. मु.पो. गेवराई, ता. जि. बीड) गंभीर जखमी झाला.

ADVERTISEMENT

जखमी व्यक्तीला तातडीने सिद्धीविनायक नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस नाना मदने व सचिन नरुटे तसेच ॲम्बुलन्स चालक तुळशीराम अहिरे यांच्या तत्परतेमुळे दत्ता यांचे प्राण वाचवले गेले.

स्थानिकांनी सांगितले की, अपघाताची दृश्ये पाहून पोलीस आणि ॲम्बुलन्स तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमीला त्वरीत रुग्णालयात नेले. पोलीसांनी घटनास्थळी पाहणी करून अपघाताचे तपशील नोंदवले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!