अनैतिक संबंधातून आईने प्रियकरांच्या मदतीने जन्मदात्या मुलांच्या खुनाचा कट… चौघा आरोपींना तळबीड, कराड शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या,


सातारा प्रतिनिधी :कलावती गवळी

कराड तालुक्यांतील तळबीड पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये जन्मदात्या आईनेच प्रियकरांच्या मदतीने मुलाच्या खुनाचा कट रचला प्रियकरांच्या आणि दोन साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाचा खून करण्याचा प्रयत्नही देखील केला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे, यामध्ये शोभा महादेव शेंडगे (वय 38) जयेंद्र गोरख जावळे (वय 40) सिद्धार्थ विलास वाव्हळे (वय 25) अकबर महबूब शेख (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत तर कोणी हल्ल्यात जखमी झालेल्या प्रशांत महादेव शेंडगे (वय 24) मूळ रा. शिंवडे ता. कराड जि. सातारा) याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तळबीड पोलीस ठाणेच्या वराडे गावच्या हद्दीतमध्ये एक अनोखी एक इसम गंभीर अवस्थेत पडला आहे अशी माहिती स.पो.नि. किरण भोसले यांना मिळताच त्यांनी आपल्या स्टाफ घटनास्थळी धाव घेतली घटनेच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पोलिसांना अमोल ठाकूर यांनी वेगवेगळी पथके तयार करून तपासाची चक्रे चांगलीच गतिमान करून अवघ्या काही तासांत चौघा संशयित आरोपींपर्यंत पोलिसांना पोहाचता आले सदर खुनाचा कट हा अनैतिक संबंधातून जन्मदात्या आईने आपल्या प्रियकरांच्या आणि साथीदारांच्या मदतीने रचला असल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप स.पो.नि. किरण भोसले स.पो.नि.अशोक भापकर स.पो.नि. रवींद्र भोर स.पो.नि.अमित बाबर स.पो.नि. रोहित करणे तसेच तळबीड,उंब्रज पोलीस ठाणेकडील कर्मचारी आणि कराड शहर पोलीस ठाणे, डी.बी पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या खुनाच्या तपासकामी सहभाग घेतला, सर्व प्रभारी अधिकारी पोलिस अंमलदारांचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!