शहीद जवान सचिन यादव वंनजे यांना जड अंत:करणाने अखेरचा निरोप…! आठ महिन्यांची लाडकी लेक झाली पोरकी..!
संभाजी पुरीगोसावी (नांदेड जिल्हा) प्रतिनिधी. नांदेड जिल्ह्यातील देगलूर गावचे भूमिपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील जवान सचिन यादव वंनजे हे दि. ६ मे रोजी आपल्या नियोजित पोस्टिंग कडे रवाना होत असताना त्यांचे सैनिकी वाहन खोलदरीत कोसळल्याने त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, जवान सचिन वंनजे यांनी 2017 मध्ये भारतीय सैन्य दलात प्रवेश केला होता. पहिली पोस्टिंग थेट सियाचीन मध्ये झाली होती. त्यांचे 2022 मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या केवळ आठ महिन्यांची चिमुकली मुलगी आहे आई वडील असा परिवार आहे, मार्चमध्ये ते सुट्टीवर आले होते आणि एप्रिल मध्ये परत ड्युटीवर रुजू झाले होते. त्यानंतर शेवटी शौर्यपूर्ण आयुष्य त्यांनी आपले पणाला लावले, जवान सचिन यादव वंनजे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत त्यांच्यावर शासकीय मानवंदना देवुन अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी देगलूरसह परिसरांतून मोठा जनसमुदाय उपस्थित होता. भारत माता की जय, अमर रहे अमर रहे सचिन वंनजे अमर रहे ! अशा राष्ट्रभक्तीने भरलेल्या घोषणांनी देगलूरचा परिसर दुमदुमून गेला होता, आणि शहीद जवान सचिन यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार नितेश अंतापुरकर तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. शहीद जवानाच्या कुटुंबियांसाठी जनसागरांने अश्रूं वाहिले, विविध मान्यवरांनी शहीद जवान सचिन यादव वनंजे यांच्या पार्थिंवावर पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली,