दलित पँथरची अन्याय अत्याचाराविरोधात पॅंथर डरकाळी – डॉ. घनश्याम भोसले महाराष्ट्र अध्यक्ष


[

पुणे, दि.7 :- दलित समाजावर होणारा अत्याचार योग्यवेळीच थांबला पाहिजे यासाठी दलित पँथरचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.घनश्याम भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली दलित पँथरच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी कलावती झाकडे यांची नियुक्ती करण्यात आली.

बौद्ध विहारांमध्ये सभेची सुरुवात झाली त्या सभेला संबोधण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शरणागत परशुराम पुणे जिल्हा उपाध्यक्ष आकाश पुणे आकाश बोंडे अतुल पवार पुणे शहर उपाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश अहवाल पुणे शहर अध्यक्ष राधिका शरणागत ही उपस्थित होते.

यावेळी दलित पॅंथर महिला आघाडी शाखेचे उद्घाटन दलित पँथरचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले यांनी केले .

ADVERTISEMENT

या कार्यक्रमात विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले व देश बलशाही बनवण्यासाठी वाटचाल सुरु असताना ते स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम सध्याचे केंद्रातील सरकार करत आहे. लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून देशाची प्रगती होत असताना शेतकरी, तरुण, व्यापारी वर्गाला खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आले आणि आता संविधान व्यवस्था बदलण्याचे काम केंद्रातील सरकार करत आहे आता जिथे अन्याय अत्याचार होईल तेथे पॅंथर डरकाळी फोडल्या शिवाय गप्प बसणार नाही तसेच पूर्ण शहराची बांधणी झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे डॉक्टर घनश्याम भोसले यांनी सांगितले व सभासद नोंदणी जोरात करून प्रत्येक चौकात दलित पँथरची शाखा उभी झालीच पाहिजे तसेच जिथं अन्याय अत्याचार होईल तेथे दलित पँथर आवाज उठवणार म्हणजे उठवणार असे सांगितले.

या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!