नवनियुक्त भोर महसूल विभागाचा पदभार स्वीकारलेले तहसिलदार आणि प्रांतआधिकारी यांचे भोर तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत..


कार्यकारी संपादक : सागर खुडे

भोर महसूल विभागाच्या प्रांताधिकारी पदाचा डॉ. विकास खरात यांनी तर तहसीलदार पदाचा श्री. राजेंद्र नजन यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यावेळी प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट देत निवडणुक प्रमुख भोर विधानसभा

श्री.किरण दादा दगडे पाटील यांनी दोघांचे स्वागत केले. महसूल विभागात नारिकांच्या कामाला गती मिळावी, सूशासनाची अंमलबजावणी व्हावी, त्याप्रमाणें पारदर्शक काम करून जमिनीचे लेटीगेशन व्यवहार अजिबात होणार नाहीत बोगस जमिनीवर नावे लागली जाणार नाहीत आणि असं करणाऱ्यांना ताबा न देता ज्यांची वहिवाट आहे अशा शेतकरी कुटुंबाला जमीन मिळवुन देण्यासाठी त्यांच्या शेताचे बांधावर जागीच पंचनामे करून रीतसर त्यांच्या नावावर जमिनी करून देण्यासाठी सहकार्य करावे तसेच रॉयल्टी,अवैद्य उत्खनन,अवैद्य माती,वाळू, डबर वाहतूक, अवैद्य दारू धंदे मटका जुगार गुत्ते अशा सर्व गोष्टी बंद होण्यासाठी प्रशासनाने या तक्रारीसंदर्भात दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यापर चर्चा झाली. शासकीय योजना, लोकप्रतिनिधी म्हणून सहभाग,सहकार्य यावर मत व्यक्त केले.

ADVERTISEMENT

 

प्रांताधिकारी डॉ. विकास खरात तसेच तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या पुढील कामकाजास स्नेहपुर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी माझे सहकारी भाजपा भोर शहर अध्यक्ष  सचिनजी कण्हेरकर, सरचिटणीस  अनिरुद्ध धाराशिवकर, पुणे जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस  राजाभाऊ गुरव, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष  अमर बुदगुडे, पुणे जिल्हा चिटणीस संतोषजी लोहोकरे आदी मंडळी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!