जनसेवा हीच ईश्वरसेवा! अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रायरेश्वर येथील शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप….


कार्यकारी संपादक:  सागर खुडे

श्रावण सोमवार निमित्त भोर राजगड (वेल्हा) मुळशीचे कार्यसम्राट आमदार  मा.श्री.संग्रामदादा थोपटे यांचे मार्गदर्शनातून व अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमातून आयोजीत केलेल्या किल्ले रायरेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा शुभारंभ करत उपस्थितांशी संवाद साधला.

ADVERTISEMENT

रायरेश्वर येथील ८५ नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली लोकांना या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपचारासाठी नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून हातभार लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून केला.

प्रसंगी राजेंद्र शेटे, संतोष केळकर, सुनील जेधे, दादा चिकणे, डॉ.अक्षय वाघमारे, डॉ.श्रेयस निगडे, रावसाहेब चौधरी, संजय वाडकर, धनाजी भोसले, मा.सरपंच नारायण जंगम, ग्रा.पं.सदस्या पार्वती कृष्णा जंगम, सखाराम जंगम, जगन्नाथ जंगम, प्रकाश जंगम, प्रवीण जंगम, हेमंत जंगम, दगडू जंगम, गोपाळ जंगम, शाळेतील शिक्षक आत्माराम हांडे यांच्या ग्रामस्थ व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!