सासवड येथे अकस्मित मयत! ओळख पटविण्याबाबत सासवड पोलीस स्टेशनचे नागरिकांना आव्हान.
सासवड : पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 47/2024 सीआरपीसी 174 प्रमाणे सासवड पोलीस स्टेशनला दिनांक 01/06/2024 रोजी दाखल आहे. सदर अनोळखी मयत पुरुष जातीचे, रंगाने काळे,अंदाजे वय 60 ते 65 वर्षे, उंची अंदाजे 5 फूट, नाक सरळ, अंगात पांढरी बंडी व पांढरे धोतर, डोक्यात पुढील बाजूस टक्कल पडलेले तसेच बारीक काळे पांढरे केस, उजवे पायास गुडघ्यापासून नडके पर्यंत जखम त्यावर पांढरी पट्टी बांधलेली अशा स्थितीत अस्मिता वडेवाले समोरील पीएमटी बस स्टॉप येथे येथे मिळून आले आहे. सदर मयताची खबर जय देवेंद्र घोडके राहणार भाजी मंडई सासवड यांनी दिलेली आहे.सदर मयताचे नातेवाईकांचा शोध व्हावा याकरिता पोलिसांनी सांगितले आहे. सदर अनोळखी मयताचे नातेवाईक मिळून आल्यास सासवड पोलिसांशी संपर्क साधावा.
1)सासवड पोलीस स्टेशन 02115/222333
2)पो नि आर बी अधिकारी +91 95527 47480
3)पो हवा 1874/ एल वाय मुजावर 9823761566


