लोणंद रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट प्रशासन लक्ष देईल काय
उपसंपादक :दिलीप वाघमारे
लोणंद शहरातील रेल्वे स्टेशन परिसर मोकाट कुत्र्यांचा कळप सातत्याने आढळून येत असतो त्यामुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी याच मार्गावरून शाळा मार्केट यार्ड विविध भागात ये जा करीत असतो लहान बालकांच्या अंगावर कुत्र्यांचा कळप धावून जातो वेळप्रसंगी बालकांचे बरे वाईट होण्याचा संभव शक्यता नाकारता येत नाही संबंधित प्रशासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करणे काळाची गरज आहे यापूर्वी मीडियाद्वारे पत्रकार दिलीप वाघमारे यांनी आवाज उठवला होता दरम्यानच्या काळामध्ये कळप नाहीसा झाला होता परंतु हल्ली चालू आठवड्यात अनेक प्रकार सातत्याने घडत आहेत वेळप्रसंगी वेळ कोणाची पण येईल त्याला कोण वाचवणार अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संबंधित अधिकारी यांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना केली तर हा प्रश्न मार्गी लागून परिसरातील कुटुंबांना न्याय खऱ्या अर्थाने मिळेल अशी मागणी नागरिकांनी केली आहे


