करंजखोप मध्ये घरगुती लाडक्या बाप्पांना, भक्तिमय वातावरणात अन् जड अंतकरणाने दिला निरोप, पुढच्या वर्षीं लवकर या !
संभाजी पुरीगोसावी.
उत्तर कोरेगांव तालुक्यांतील ग्रामीण भागातील घरगुती लाडक्या बाप्पांना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षीं लवकर या ! असा जयघोष करीत जड अंत:करणाने लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात आला, गेले दहा दिवसापासून गणेशोत्सव उत्साहात साजरा, सर्वत्र गणपती बाप्पा मोरया, भक्तीमय आणि मंगलमय वातावरण चांगलेच पाहायला मिळाले होते, आज ( दि.17 सप्टें) रोजी करंजखोप गावातील घरगुती लाडक्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात आणि जड अंतःकरणाने गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षीं लवकर या असा जयघोष करीत मंगळवारी सकाळपासूनच घरगुती लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येत होता, ढोल ताशांच्या गजरांत आणि गुलालाची उधळण करीत घरगुती लाडक्या बाप्पांनाही निरोप देण्यात आला, लाडक्या बाप्पांना निरोप देताना गणेश भक्तांचे देखील डोळे पाहून गेले होते, करंजखोप मध्येही संभाजी पुरीगोसावी यांनी आपल्या घरगुती बापाला देखील जड अंत:करणाने निरोप दिला, त्यांच्यासमवेत घरगुती लाडक्या बाप्पा समावेश होतो, यामध्ये विष्णू लक्ष्मण भिलारे ( अण्णा ) निलेश विष्णू भिलारे हनुमंत विष्णू भिलारे किशोर शंकरराव भोसले ( काका ) विठ्ठल शंकरराव भोसले ( आबा ) आपल्या लाडक्या बाप्पांसमवेत उपस्थिती होती, तसेच गणेश भक्तांसोबतच प्रशासन पोलिसांनीही जोरदार तयारी केली होती, पोलीस प्रशासनामध्ये देखील भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले, विविध पोलीस ठाण्यात गणरायाचे देखील आगमन झाले होते, पोलिसांनी देखील आपल्या पोलिस ठाणेतील लाडक्या बाप्पाला भक्तिमय आणि जड अंतःकरणाने निरोप दिला, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमींवर सातारा पुणे, मुंबई सह राज्यांत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,


