नांदेड जिल्ह्यात पोलीस हेड कॉन्स्टेबलने केला पत्नीचा खून, किरकोळ कारणांतून पत्नीला संपविले स्वतः पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाण्यात हजर !
संभाजी पुरीगोसावी
नांदेड जिल्ह्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने घरांतील किरकोळ वादातून टोकाचं पाऊल उचलत पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून तिचा खून केला आहे, ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील धनेगांव परिसरांत (दि.17 सप्टें) रोजी सायंकाळच्या सुमारांस समोर आली आहे, आरोपींचे नाव अफजल पठाण असे असून तो नांदेड येथील विमानतळ पोलिस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता, अफजल पठाण यांच्या पत्नी नाजीम बेगम यांच्याशी किरकोळ कारणावरून भांडणे सुरू होती, यावेळी रागांच्या भरात पठाण यांनी त्यांच्या जवळ असलेल्या बंदुकीतून पत्नीवर गोळ्या झाडून त्यामध्ये नाजीम बेगम यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आरोपी हेड कॉन्स्टेबल अफजल पठाण स्वतःहून ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला, नांदेड शहरांत आज सर्वत्र गणेश विसर्जन सोहळा सुरू होता सर्वत्र पोलीस बंदोबस्तात गणपती विसर्जन शांततेत सुरू होते, यावेळी विमानतळ पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकांतील कार्यरत असणारे पठाण यांनी आपल्या धनेगांव येथील आयडीयल कॉलनीत वास्तव्यास होते, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ते घरी पोहोचले, यावेळी पती-पत्नीमध्ये घरगुती वाद सुरू होता, यावेळी पठाण यांनी आपल्याच शासकीय बंदुकीतून आपल्या पत्नीवर गोळीबार केला या गोळीबारात पठाण यांच्या पत्नीचा जागेवर मृत्यू झाला, या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यांचे पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी अफजल पठणला ताब्यांत घेतले असुन, पत्नीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असून या घटनेने नांदेड जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अफजल पठाण यांनी असे का केले..? याचा तपास आता पोलीस करीत आहेत,*


