कोरोना महामारीच्या साथीतील अपयशी ठरलेल्या व्यवसायिक धारकांचे कर्ज कर्जमाफी आंदोलन


संपादक: दिलीप वाघमारे

फलटण, दि. ३ मार्च २०२५

कोरोना महामारीच्या रोगराई साथीच्या कालावधीत शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे घेतलेले कर्ज परत करू शकत नसल्याने बँका, पतसंस्था आणि वित्तीय संस्थेने कर्ज माफ करावे किंवा तडजोड करून कर्जमुक्तीचे दाखले द्यावे अशा मागणीसाठी विजय ग्रामीण बिगर शेतकरी पतसंस्था आदर्की ता. फलटण जि. सातारा या कार्यालयासमोर “न्याय आंदोलन”झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेच्या मार्फत आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनाचे नेते, मा. श्री. भगवानराव वैराट हे म्हणाले की, जागतिक पातळीवर अशा महामारीमुळे अनेकाचे व्यवसाय ढबघाईला आल्या असून आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या व्यावसायिक कर्ज धारकांना कर्ज फेडणे अशक्य झाले आहे, त्यामुळे सर्वसामान्य अल्पव्यवसायिक धारकांना कर्ज फेडणे अशक्य असून पतसंस्थेने त्यांच्या मनमानी प्रमाणे मुद्दलरक्कमे व्याजदंड इत्यादी आकारून लाखो रुपयाचा वसुली तगादा लावल्यामुळे कर्ज धारकांच्या पुढे आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेला नसल्याने बँकांनी पतसंस्था यांनी कर्जमुक्ती करून मानवतेच्या दृष्टिकोनातून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

ADVERTISEMENT

याप्रसंगी सातारा जिल्हाध्यक्ष श्री शिवाजीराव भिसे, महिला आघाडीध्यक्षा, श्रीमती सुनिता जाधव, कामगार सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन वन्ने ——पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महंमद भाई शेख.उध्दव कर्णे.राज्य संघटक बाळकृष्ण लोळे. राज्यसंघटक सुरेखा भालेराव इत्यादी प्रमुखांची भाषणे झाली. या आंदोलनात शिवाजी अवघडे.संजय सकटे‌ . प्रविण संकपाळ. .पल्लवी कंदगळ . शाहिन जमादार संतोष आवटे.पवित्रा आवळे . विजय बनसोडे.विश्वनाथ सपकाळ.नितिन वैराट.सिताराम मसुगडे.अशोक खुडे . विजय वैराट.संदीप माने.सागर कदम. अर्जून आवळे.. तसेच संघटनेचे सभासद व कर्जपिढीत मोठया प्रमाणात सहभागी होते.या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळा बरोबर खेळीमेळीच्या वातावरणात बैठक होऊन तडजोडीने संबंधीतांना न्याय मिळाला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!