शेतकऱ्याच्या हितासाठी शिवप्रहार संघटना आक्रमक,निवेदन देत केला आंदोलनाचा इशारा
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
नव्या कर्जमाफीमुळे फेब्रुवारी महिना उलटला नवीन वर्ष तरीही शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले गेले नाही.विजय मल्ल्या, रत्नाकर गुट्टेसारख्या बड्या उद्योगपतींना बँका कर्ज देतात; परंतु शेतकऱ्यांना साधे पन्नास हजार रुपयांचेही कर्ज दिले जात नाही,आणि हा प्रश्न बाजूलाच राहिला. शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असतानाही त्याचीच अवस्था बिकट झाली आहे. कष्ट करून घाम गाळून तो मातीतून मोती पिकवतो पण त्यानेच पिकवलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही,त्यामुळं शेतकरी आत्महत्येच्या मार्गाकडे जात आहे.केंद्रसरकाने शेतकऱ्याच्या मालाला कमीत कमी योग्य हमीभाव द्यावा,त्यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावे, प्रदूषण कायद्यामध्ये शेतकऱ्याचा समावेश करू नये, त्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, शेतकरी शेतमजूर यांना पेन्शन योजना लागू करावी, वीज दुरुस्ती विधेयक अशा अनन्य साधारण अटीशर्ती मायबाप सरकार पुढे मांडल्या जाऊनही त्याकडे कानाडोळा केलं जात आहे, त्याबद्दल शेतकरी संघटनांनी यांमागेदेखील शेतकरी बांधवांच्या हितासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला असतानाही आजवर त्यास महायुती सरकारने दुजोरा देण्याचे काम चालवले आहे.सरकार निवडून येण्याअगोदर कर्जमाफी,योग्य मालाला योग्य हमीभाव देण्याची घोषणा केल्या जात होत्या त्याबद्दल कोणीच काही प्रयत्न करीत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.
त्या संदर्भात शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी मोहिते यांनी दि.२८फेब्रुवारी२०२५रोजी तहसीलदार कार्यालयांस निवेदन पत्र देऊन दि.२४मार्च२०२५रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला.आणि होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असेही सांगितले.
निवेदन पत्र देताना संघटनेचे अध्यक्ष संतोषजी मोहिते, शिवप्रहार प्रतिष्ठान महा.राज्य ॲड.नवनाथ पारखे, राजेंद्र वाघमारे, पांडे सरपंच तेजस साळुंखे, वागजवाडी उपसरपंच समीर आवाळे, इंगवलीचे प्रशांत साळुंखे, संतोष साळुंखे,नितीन धाडवे, रोहिदास पवार, अजिंक्य सोकांडे, आदिनाथ महांगरे, केंजळचे विकास मोरे,अशोक मोरे यांसह अन्य शेतकरी बंधू उपस्थित होते


