जावली तालुका शालेय खो-खो स्पर्धा संपन्न ; खेळाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन प्रगल्भता येते- मा.संजय धुमाळ
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
जावली ( मामुर्डी ) : महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग तथा क्रीडा कार्यालय सातारा यांचे वतीने शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.जावली तालुकास्तर स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या IS0 मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे संपन्न झाल्या.जावलीचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.संजय धुमाळ यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.यावेळी मार्गदर्शन करताना धुमाळ साहेबांनी खो-खो खेळाचा इतिहास सांगुन खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती वाढीस लागते.असे प्रतिपादन श्री.धुमाळ साहेबांनी केले.
या स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुले गटात जि.प.शाळा सावली , मुलींमध्ये धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर, १७ वर्षांखालील मुले गटात क्रांती विद्यालय सावली, मुलींमध्ये माध्यमिक विद्यालय करंदी,१९ वर्षांखालील मुले गटात आ.शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा, मुलींमध्ये आ.शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या संघांनी विजय मिळवला.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.चंद्रकात कर्णे,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अरविंद दळवी, केंद्रप्रमुख श्री.सुरेश धनावडे,श्री.बळवंत पाडळे,श्री.रघुनाथ दळवी,सौ.वंदना गंगावणे,श्री.डी.टी.धनावडे,श्री.शंकर जांभळे,श्री.प्रकाश धनावडे,श्री.अशोक लकडे,श्री.बजरंग चौधरी, मामुर्डी सोसायटीचे चेअरमन श्री विनोद जुनघरे , बोंडारवाडी धरण कृती समितीचे पुणे विभागीय सदस्य श्री एकनाथ सपकाळ , श्री.सोपान धनावडे , मुख्यध्यापक शिंदे सर शिक्षक स्टाफ हे उपस्थित होते.