बिभवी येथे स्वच्छता मोहीम संपन्न.
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी :- बजरंग चौधरी
जावली तालुक्यातील कब्बडी या खेळासाठी प्रसिद्ध असलेले बिभवी येथे स्वच्छता मोहीम संपन्न झाली स्वच्छता ही सेवा अंतर्गत दैनंदिन उपक्रम राबवित असताना स्वच्छता ही सेवा शुभारंभ करत गावामध्ये सर्व ग्रामस्थ यांनी आपापल्या अंगणातील व घर परिसर स्वच्छ केला . तसेच एक दिवस श्रमदान अंतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणे , मंदिर परिसर , रस्ते , येथील ठिकाणचे स्वच्छता ग्रामस्थामार्फत करणेत आली , सदरचे महास्वच्छता अभियान राबवित असताना श्रमदानासाठी आलेले सर्व ग्रामस्थ यांनी स्वच्छता बाबत शपथ घेतली सदर श्रमदान करतेवेळी तालुक्याचे प्रमुख गटविकास अधिकारी मनोज भोसले साहेब व स्वच्छ भारत मिशन BRC , संतोष जाधव यांनी गावास भेट दिली व सदर भेटी दरम्यान गावामध्ये सुरू असलेल्या सार्वजनिक महा श्रमदान मध्ये स्वतः हातात झाडू घेऊन अभियानात भाग घेतला त्यावेळी ग्रामपंचायत बिभवी चे लोकनियुक्त सरपंच संतोष बांदल , उपसरपंच , काजल परिहार , ग्रामपंचायत सदस्य
, ग्रामपंचयत सदस्य , कांताराम शिंदे , आरती बांदल , स्वाती देशमुख ,अनुसया माने , विक्रम जाधव , सागर परिहार सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग वाघ , बोडारवाडी धरण कृती समितीचे सदस्य राजेंद्र जाधव यांनी गावाचे दैवत श्री भैरवनाथ मंदिर पासून ते गावातील स्वागत कमान पर्यंत महा स्वच्छता अभियान यशस्वी पणे राबविले त्याचं प्रमाणे गाव पातळी काम करणारे क्षेत्रीय कर्मचारी अंगणवाडी सेविका पुष्पा देशमुख , सुरेखा पवार , मदतनीस लता परिहार आशा सेविका अनिता शिंदे व सुनील शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी , पोलीस पाटील भिमराव परिहार , व गावातील ग्रामस्थ यांनी कार्यक्रमात यशस्वी सहभाग घेतला .सदर स्वच्छता अभियानाची सांगता चंद्रकांत कोळी ग्रामसेवक बिभवी यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानून सर्व ग्रामस्थ याना स्मार्ट ग्राम बाबत माहिती देऊन सहभाग नोंदविणे साठी आवाहन केले .


