कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांचा हृदयविकारांच्या तीव्र धक्क्याने निधंन, पुणे ग्रामीण पोलीस दल हळहळले.
संभाजी गिरीगोसावी : प्रतिनिधी.
पुणे ग्रामीण पोलीस विभागांतील खेड पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय 35) (रा.वांगी वडाळा अकलूज जि. सोलापूर ) यांचे कर्तव्य बजावताना हृदयविकारांच्या झटक्याने निधंन झाले त्यांच्या अचानक निधनामुळे पुणे ग्रामीण पोलीस दल हळहळले आहे, त्यांच्या पश्चांत पत्नी एक मुलगी एक मुलगा आई वडील भाऊ असा त्यांचा परिवार होता, जुन्नर पोलीस ठाण्यातून मागील महिन्याभरांपूर्वीच खेड पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते, कर्तव्यावर असताना आज सकाळी पोलीस ठाणेत त्यांच्या अचानक छातीमध्ये दुखू लागल्याने पोलीस कर्मचारी अर्जुन गोडसे व सहकाऱ्यांनी साळुंखे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते, पुढील उपचारांसाठी चाकण येथे रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाला देखील मोठा धक्का बसला आहे, त्यांच्या अचानक निधनामुळे पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनासह महाराष्ट्र पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे, पुणे ग्रामीण पोलीस दलात त्यांनी विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली होती, कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वत यांना रोखठोक महाराष्ट्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.