खंडाळा- शालेय विद्यार्थ्यांनी गिरवले मूलभूत संगणक शिक्षणाचे धडे बीसीए विभागाचा कल्पक उपक्रम.
खंडाळा प्रतिनिधी :धर्मेद्र वर्पे.
शालेय विद्यार्थ्यांनी गिरवले मूलभूत संगणक शिक्षणाचे धडे
बीसीए विभागाचा कल्पक उपक्रम.
आज ०४ सप्टेंबर रोजी सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय बीसीए विभाग विद्यार्थ्यांकडून राजेंद्र विद्यालय इ.०७ वी विद्यार्थ्यांना मूलभूत संगणक साक्षरता सत्राचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी विद्यार्थिनी साक्षी जावळे हिने संगणक साक्षरता सत्राचा उद्देश सांगितला. यानंतर प्रिया जावळे,प्रणोती नरूटे यांनी विद्यार्थ्यांना MS office,Word Excel,Paint यासोबत Copy-paste या प्रकारांची माहिती प्रत्यक्ष ज्ञान व प्रात्यक्षिक द्वारे दिली.श्रद्धा शिंदे, समीक्षा माने,विद्या नेवसे यांनी प्राप्त ज्ञानाचा वापर शालेय विद्यार्थ्यांना करून देताना संवाद व कृती कौशल्य व मनोरंजनातून ज्ञान देवाणघेवाण केली.तंजीला शेख,दुर्गा कारंडे,सामिया शेख यांनी प्रश्न-उत्तर रूपात विद्यार्थ्यांना संगणक बद्दल अनभिज्ञ माहिती प्राप्त करून दिली व शंका निरसन केले. प्रा काजल पाटील,प्रा.अमीर इनामदार यांनी सत्राचे समन्वय केले,बीसीए विभाग प्रमुख प्रा.वर्षा गाढवे,राजेंद्र विद्यालय प्राचार्य शब्बीर नालबंद,प्राचार्य डॉ हणमंत जाधव यांनी कल्पक उपक्रमाचे संयोजन केले.सहशिक्षक रतिलाल गावीत अशोक चौरे यांनी सहकार्य केले. जवळपास १२० विद्यार्थ्यांनी सत्राचा लाभ घेतला.