भव्य भूमिपूजन सोहळा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटेवर भोर तालुक्यातील गावं
मंगेश पवार
सारोळे :- भोर तालुक्यातील भोंगवली, भांबवडे, न्हावी आणि पेंजळवाडी या गावांमध्ये विविध विकासकामांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ शनिवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पार पडला.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवा नेते कुलदीप कोंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि उपसभापती अमोल पांगारे, इच्छुक उमेदवार हर्षद बोबडे, तसेच विकास चव्हाण, संदीप सोनवणे, बाळासाहेब शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंजूर विकासकामांचा तपशील
भोंगवली : ग्राम सचिवालय बांधकामासाठी एकूण ₹२० लाख (₹१० लाख + ₹१० लाख)
भांबवडे : अंतर्गत रस्ते बांधकामासाठी ₹२० लाख
न्हावी (३२२) : अंतर्गत रस्त्यासाठी ₹१० लाख
न्हावी (३१५) : अंतर्गत रस्त्यासाठी ₹१० लाख
पेंजळवाडी : शेतरस्ता वस्ती ते पेंजळवाडी जोडण्यासाठी ₹१० लाख + कुलदीप कोंडे यांची स्ववर्गणी ₹१ लाख
“मी काम करत आलोय आणि काम करत राहीन. अजूनही काही गावांसाठी निधी देण्यात येणार आहे. अमोल पांगारे आणि कुलदीप कोंडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या निधीतून सारोळे–वीर रस्त्याचे कामही लवकरच सुरु होईल. कोणी काहीही सांगो, पण रस्ता कामासाठी निधी आणणारा माणूस म्हणजे कुलदीप कोंडेच आहे,”
हर्षद बोबडे सर
तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भोंगवली–कामथडी गटात स्पष्ट चित्र लवकरच दिसेल, असा विश्वास दिलीप तनपुरे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी कुलदीप कोंडे, अमोल पांगारे, विकास चव्हाण, दिलीप तनपुरे, संदीप सोनवणे, बाळासाहेब शेडगे आदींनी हर्षद बोबडे सरांना पंचायत समितीसाठी शुभेच्छा दिल्या.


