“वेळ आलीये आता आपल्या महादेवची! के.डी.भाऊंचा भोंगवली–कामथडी गणात विजयाचा निर्धार!”


मंगेश पवार

सारोळे (ता. भोर): आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोंगवली–कामथडी गटातून माझ्या मुलाला महादेव किसनराव सोनवणे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची अधिकृत मागणी केली आहे.

आपल्या कार्यालयात पत्रकार बांधवांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

के.डी.भाऊ सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कि, “निवडणुकीची प्रक्रिया पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरच्या बारा-तेरा तारखेला सुरु होईल. या निवडणुकीत मी माझा मुलगा महादेव किसनराव सोनवणे याला उमेदवार म्हणून उभं करायचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.”

 

“भोंगवली–कामथडी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन आम्ही लोकांचे मत जाणून घेतले. गावातील अनेकजण रोजगारासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये गेले असले तरी त्यांनी सोशल मीडियाद्वारे, दूरध्वनीवरून आमचा पाठिंबा जाहीर केला आहे.

ADVERTISEMENT

सर्वत्र एकच आवाज आहे – ‘भाऊ, तुमच्या मुलाला उभं करा, आम्ही सगळे सोबत आहोत!’”

 

के.डी. भाऊ हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत मतदारांशी सातत्याने संपर्कात असून पुणे-मुंबईसह बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.

त्यांच्या मुलाला महादेव सोनवणे हे जिल्हा परिषद साठी इच्छुक असल्याने स्थानिक पातळीवर जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

के डी भाऊ सोनवणे पुढे म्हणाले, “भाजपचे वरिष्ठ नेते मा. आमदार कार्यसम्राट संग्राम थोपटे, जिवन कोंडे, बाळासाहेब गरुड, संतोष धावले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यरत आहोत. पक्षाने संधी दिल्यास आम्ही जनतेच्या विश्वासावर खरे उतरू आणि भोंगवली–कामथडी गटाचा विकास घडवू.”

 

या बैठकीला स्थानिक कार्यकर्ते, समर्थक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी महादेव सोनवणे यांच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पक्षाने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!