किकवी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा….
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
गुरुवार दिनांक ५सप्टेंबर २०२४रोजी किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवीमध्ये श्री चक्रधर स्वामी जयंती यांची साजरी करण्यात आली. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी श्री चक्रधर स्वामी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. विद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशा मुक्त होऊन शिक्षकी पेशा स्वीकारत शिक्षक दिन साजरा केला. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला.इयत्ता दहावीचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भूमिकेत पाचवी ते नववीच्या वर्गामध्ये अध्यापन करत होते.विद्यार्थी आत्मविश्वासाने उत्साहाने या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते . या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून लाभलेले शविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक उत्तमराव अहिरे सर, सद्ध्याचें मुख्याध्यापक विनोद राऊत सर व सर्व शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने त्यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षक स्टाफ यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने स्वतः करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची भाषणे झाली. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मगर सर यांनी केले व श्री मोरे सर यांनी आभार मानले.