आशीर्वाद कंपनीचे केमिकल युक्त दूषित पाणी पोट पाटात सोडल्याने बकरी दगावल्याने ग्रामस्थ संतप्त
उपसंपादक : दिलीप वाघमारे
लोणंद खंडाळा रोडवर सुखेड गावा नजिक समर्थ नर्सरी लगत आशीर्वाद कंपनी अनेक वर्षे उभी आहे या कंपनीची केमिकल युक्त पाणी धोम बलकवडी पोट पाटात सोडल्याने ं मेंढरं काही दगावली तर काही मेंढरं आजारी पडली या परिसरामध्ये अनेक विहिरी आहेत या परिसरातील विहिरीमध्ये पाणी पाझरून येण्याची शक्यता नाकारता येत नाही काही पिकांची वाढ थांबले असून या परिसरात दुर्गंधी अधिक अधिक वाढत असून ग्रामस्थांना जगणं मुश्किल झाली आहे पडळकर वस्ती वर 1000 लोकसंख्या असून अनेक घर बांधकाम करून राहत आहेत या आशीर्वाद कंपनीविरुद्ध सुखेड ग्रामस्थ व सरपंच यांच्यावतीने यापूर्वी निवेदन दिले होते परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतल्याने आज सात सप्टेंबर रोजी कंपनीच्या गेटवर ग्रामस्थांनी हल्लाबोल केला संतप्त जमावाने आगामी काळात कंपनीने योग्य दखल न घेतल्यास काळे ठोकण्याचा इशारा दिला आहे कंपनीच्या परिसरात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पत्रकार आदींनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे आगामी काळात ग्रामपंचायत सुखेड तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच रवी धायगुडे यांनी दिली असून उपसरपंच बाबासाहेब धायगुडे बाळकृष्ण पडळकर बापूराव धायगुडे सदस्य गुलाब धायगुडे महादेव चोपडे बाबुराव पडळकर ओमकार रासकर आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते


