नवनियुक्त मुंबई पोलीस कांचन अडसूळ चे सर्वत्र कौतुक.
खंडाळा प्रतिनिधी : धर्मेद्र वर्पे.
नवनियुक्त मुंबई पोलीस कांचन अडसूळ चे सर्वत्र कौतुक.
सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय- बीकॉम भाग ०२ मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कांचन तात्यासाहेब अडसूळ नुकतीच मुंबई पोलीस दलात रुजू झाली.कांचनचे मूळ गाव फलटण तालुक्यातील तरडगाव असून आई-वडील शिरवळ खाजगी कंपनीत काम करतात.कांचनचे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण शिंदेवाडी(ता.खंडाळा) येथे झाले असून ती सध्या बीकॉम ०२ च्या वर्गात शिकत आहे. सातत्यपूर्ण कष्ट व जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात कांचनने मुंबई पोलीस शिपाई पदासाठी लेखी, शारीरिक परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस प्रशिक्षण केंद्र,अकोला येथे २६ फेब्रुवारी ते ३० ऑगस्ट २०२४ दरम्यान यशस्वीपणे प्रशिक्षण घेतले.
या दिमाखदार यशाबद्दल खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे सर,सचिव संजीव(अनिरुद्ध)गाढवे, सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ हणमंत जाधव,उपप्राचार्य डॉ. प्रतिभा पाटणे,कार्यालयीन अधीक्षक संतोष गाढवे,वाणिज्य विभागप्रमुख प्रा.निकिता पवार
,प्रा.कदम,शिस्त विभागप्रमुख प्रा.अमीर इनामदार,प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.वर्षा गाढवे,सर्व प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.