भोर तालुक्यातील नसरापूर येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची विराट सभा.
वेळू प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा भोर तालुक्यातील नसरापूर येथील शिवाजी विद्यालय येथे मंगळवार दि.१ रोजी सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे. अशी माहिती वेळू येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे प्रचार प्रमुख कुलदीप कोंडे यांनी दिली.
यावेळी कुलदीप कोंडे यांनी सांगितले की, त्यांच्याबरोबर सरपंच आणि त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश करणार आहे.
महायुतीच्या उमेदवार निवडून दिल्याने भोर आणि राजगड तालुक्याचा विकास करणार यासाठी महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना निवडून द्या.
भोर एमआयडीसी बाबत
कुलदीप कोंडे यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातील त्यांच्या दोन पिढ्यांचा विचार केला जाईल. शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय केला जाणार नाही. योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल.
या पत्रकार परिषदेला कुलदीप कोंडे, रणजीत शिवतारे, रमेश कोंडे, चंद्रकांत बाठे,भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, संतोष घोरपडे, जीवन कोंडे, बाळासाहेब गरुड, विकास चव्हाण आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.


