श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्ताने जिल्हा हिवताप कार्यालयाकडून लोणंद येथे धुर फवारणी….
संपादक: दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंद येथे दि. 26 जुन रोजी येत असलेने किटकजन्य आजार होऊ नये म्हणून मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संजय कुंभार, नोडल अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हिवताप कार्यालयामार्फत लोणंद शहरामध्ये धुर फवारणी करण्यात आली तसेच खंडाळा तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचे मार्फत डास अळी नष्ट करणे करिता कंटेनर सर्वेक्षण घरोघरी जाऊन करण्यात आले सदर कंटेनर सर्वेक्षण व धुर फवारणीसाठी श्रीमंत माळवे, महेश पिसाळ, अजित जगताप, लक्ष्मण कदम, दुर्गादास जाधव यांनी परिश्रम घेतले यासाठी लोणंद नगरपंचायत यांचे सहकार्य लाभले.


