भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम, रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन भावपूर्ण श्रद्धांजली
संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले काल दिल्लीतील एक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वांस घेतला, राजकारणी, अर्थतज्ज्ञ आणि माझी पंतप्रधान अशी त्यांची चांगलीच ओळख होती, गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारांस अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना दिल्लीतील एक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून तसेच विविध स्तरांतून शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली, पंतप्रधान मोदी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली, डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम, रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन भावपूर्ण श्रद्धांजली,


