पती जिल्हाधिकारी, तर पत्नी महापालिका आयुक्त… मनीषा खत्री यांनी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला,
उपसंपादक : संभाजी पुरीगोसावी
नाशिक महापालिकेचे आणि वादग्रस्त म्हणून अधिकारी चर्चेत असणारे महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची बदली होणार असल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू होती, अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला, आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे राहुल कर्डिले यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली होती, मात्र ही बदली अवघ्या तासांत रद्द करण्यात आली, त्यावर आज शासनाने नवा आदेश काढून नाशिक महापालिकेला आयएस अधिकारी म्हणून मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली, त्या प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या, त्यांची नाशिक मध्ये महापालिकेच्या आयुक्त म्हणून बदलीची चर्चा चांगलीच सुरू होती, मनीषा खत्री महापालिकेच्या आयुक्त होतील असा कयास चांगलाच होता, अखेर गुरुवारी सकाळी त्यांनी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांने नाशिक येथील प्रादेशिक विभागांच्या प्रमुख मनीषा खत्री यांच्या बदलीचे आदेश काढले होते, मनीषा खत्री यांनी आपला पदभार देखील स्वीकारला, त्या निमिंत्ताने पती जलद शर्मा हे नाशिकचे जिल्हाधिकारी, तर पत्नी मनीषा खत्री याता नाशिक महापालिका आयुक्त म्हणून आहेत, पती जिल्हाधिकारी तर पत्नी महापालिकेच्या आयुक्तपदी अशी नाशिकची स्थिती असेल, या निमिंत्ताने एकाच कुटुंबाकडून शहर आणि जिल्ह्याचा कारभार हाकला जाणार आहे, तर नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी राहुल कर्डिले यांची झालेली बदली ही भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना पसंत पडली नव्हती अशी देखील सध्या सध्या चर्चा सुरू आहे.