सारोळे आणि वर्वे येथे NH-48 वर मोठे काम; ठराविक वेळेत दोन्ही दिशेची वाहतूक बंद


मंगेश पवार

सारोळे प्रतिनिधी :- भोर तालुक्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. National Highways Authority of India (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) व Maharashtra Highway Police (महाराष्ट्र महामार्ग पोलीस) यांच्या संयुक्त विद्यमाने National Highway 48 (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८) वर गॅन्ट्री व कॅन्टिलिव्हर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने या कामासाठी दोन ठिकाणी वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील सारोळा नदीजवळ सातारा जाणारा मार्ग पूर्णपणे बंद राहील. तसेच दि. ५ मार्च २०२६ रोजी दुपारी २.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत वर्वे येथे पुणे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत पर्यायी व आपत्कालीन वाहतुकीसाठी सर्व्हिस रोडचा वापर करण्यात येईल. वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सर्व्हिस रोडचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येत असून होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!