कुरंगवडी येथे धान्य भरडण्याच्या मशीनमध्ये स्कार्फ अडकून महिलेचा मृत्यू


भोर तालुक्यातील कुरंगवडी येथे धान्य भरडण्याच्या मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 21 फेब्रुवारी) सकाळी घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

कुरंगवडी येथील शुभांगी निलेश राउत (वय 41) या सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास गावातील शेतामध्ये ट्रॅक्टरला जोडलेल्या धान्य भरडण्याच्या मशीनजवळ काम करत होत्या. यावेळी त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ अचानक मशीनमध्ये अडकला. मशीन सुरू अवस्थेत असल्याने त्या त्यात ओढल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.

ADVERTISEMENT

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक जयेंद्र सुरेश राउत तसेच गावातील नागरिक संतोष कुंडलीक शिळीमकर, संतोष सर्जेराव शिळीमकर आणि ट्रॅक्टर चालक जगन्नाथ रघुनाथ कांटे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना मशीनमधून बाहेर काढले. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने नसरापूर येथील सिद्धीविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दुपारी 12.03 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी राजगड पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे नातेवाईकांनी नमूद केले आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हवालदार मयूर निंबाळकर करीत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!