भोर तालुक्यात सत्तेचे चित्र स्पष्ट; जि.प. व पं.स. सदस्यांची निवड जाहीर
मंगेश पवार
भोर तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून विविध पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत आपले प्रतिनिधी निवडून दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून
विक्रम खुटवड व प्रवीण बाळासाहेब जगदाळे हे निवडून आले आहेत.
तर पंचायत समिती सदस्य म्हणून
विशाल उर्फ बंटी कोंडे,
तृप्ती ताई खुटवड,
राजेश साहेबराव बोडके,
मनीषा संतोष कंक
यांनी यश संपादन केले आहे.
भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून
पोपट नारायण सुके व स्वरूपा संग्राम थोपटे हे निवडून आले आहेत.
तसेच पंचायत समिती सदस्य म्हणून
गीता आनंदराव आंबवले,
सुषमा विक्रम चव्हाण,
रोहन दिलीपराव बाठे,
ज्ञानेश्वर पांगारे
यांची निवड झाली आहे.
निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांचे समर्थक व कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून, नवनिर्वाचित प्रतिनिधींनी तालुक्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.


