ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश, ट्रॅक्टर अन् मोटरसायकल एकूण 8 गुन्हे उघडकीस आणून 64,70,000 / रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत, फलटण ग्रामीण पोलीसांची दमदार कामगिरी.
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसापांसून ट्रॅक्टर मोटरसायकल वाहन चोरीच्या घटनेमध्ये चांगलीच वाढ होत असताना दिसून येत आहे. मात्र फलटण ग्रामीणचे पोलीसही चांगलेच अलर्ट असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मीनगर येथील विजय दीपक राजेपांढरे यांच्या मालकीचा सुमारे 6 लाख रुपये किंमतीचा महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर (सोमंथळी ता. फलटण) येथून कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची तक्रार फलटण पोलीस ठाणेत दाखल होती. सदरच्या गुन्ह्या संदर्भात सुरुवातीला पोलिसांकडे आरोपीं बाबत कोणतेच जागेद्वारे नव्हते पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाला सूचना केल्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला गती देत फलटण तालुक्यांमधील अशा प्रकारच्या ट्रॅक्टर पार्किंगचे ठिकाण चोरी केल्यानंतर जाण्याचा मार्ग याची रेकी करून ट्रॅक्टर चोऱ्या केल्या आहेत. अखेर पोलिसांनी परिसरांतील सी.सी.टीव्ही कॅमेरे फुटेज तपासणी करून माहिंतीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत अखेर पोहाचले सुरज शंकर मदने (वय 35) अनिकेत महेश जाधव (वय 20) दोघे खडकवस्ती सांगोबाचीवाडी पणदरे ता. बारामती जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी साथीदार राजेंद्र मारुती जाधव (वय 30) ढाकाळे ता. बारामती जि. पुणे) यांच्या साथीने ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. सदर आरोपींच्या कब्जांतून एकूण 64,70,000 /किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेखर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विशाल वायकर पो. उपनि. हनुमंत दडस वैभव सूर्यवंशी शांतीलाल ओंबासे नितीन चतुरे श्रीनाथ कदम अमोल जगदाळे कल्पेश काशीद रशिदा पठाण अधिक तपास शांतीलाल ओंबासे करीत आहेत.*


