लोणंद नगरपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे 7 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न होणार
उपसंपादक : दिलीप वाघमारे
लोणंद नगरपंचायतीचा पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते सोमवार 7 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता पाण्याच्या टाकी खाली होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सौ सीमा खरात उपनगराध्यक्ष रवींद्र सिरसागर मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी दिली या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराजे देसाई खासदार सुनील तटकरे खासदार नितीन जाधव पाटील खासदार उदयनराजे भोसले आमदार रामराजे नाईक निंबाळकर आमदार मकरंद जाधव पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सौ सीमा खरात उपनगराध्यक्ष रवींद्र शिरसागर बांधकाम सभापती भरत शेळके पाटील पाणीपुरवठा सभापती रशिदा इनामदार नगरसेवक शिवाजी शेळके पाटील सौ मधुमती गालींदे सचिन शेळके, गणी कच्ची सौ दिपाली शेळके सौ राजश्री शेळके सौ ज्योती डोनेकर सौ तृप्ती घाडगे प्रवीण व्हवल सागर शेळके आनंदराव शेळके मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड नगर अभियंता सागर मोटे आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन लोणंद नगरपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे


