तडीपार इसमास केले जेरबंद! लोणंद पोलीस स्टेशनची कामगिरी.


 

लोणंद, सातारा : दिलीप वाघमारे

 

लोणंद : लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील डी बी पथकाला पेट्रोलिंग करीत असताना हद्दपार शेखर शरद खताळ वय ३२ वर्ष रा. कापडगाव ता. फलटण जि.सातारा

यास पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिसांनी केले जेरबंद.

ADVERTISEMENT

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडेवाडी ता.फलटण गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि १८ रोजी ६ वाजता सह्याद्री डाब्याच्या समोर लोणंद फलटण रोडवर हद्दपार इसम शेखर खताळ हा तिथे मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. सदर आरोपी हा शिरवळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २०३/२०२४ भा.द.वि. कलम ३२५.३४१,५०४,५०६,३४ सह आर्म अॅक्ट ३.२५ प्रमाणे दिनांक १४/०६/२०२४ रोजी दाखल असुन सदर गुन्हयात पाहीजे असलेला आरोपी आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, तसेच पोहवा विजय पिसाळ, नितीन भोसले, मपोकों अश्विनी माने, ऋतुजा शिंदे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!