न्हावी येथील शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांतर्फे वह्या पुस्तके व शालेय वस्तू विद्यार्थ्यांना वाटप.
संपादक : मंगेश पवार
सारोळे : जि.प.प्राथ.शाळा न्हावी शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष 2024/25 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात
जिप प्राथ शाळा न्हावी शाळेतील सर्व मुलांना न्यू इंग्लिश स्कूल न्हावीचा माजी विद्यार्थी संघ 1998/99 बॅचच्या वतीने दि. १८/६/२४ रोजी प्रती विद्यार्थी 3 वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.नुकताच माजी विद्यार्थी संघाचा 1998/99 बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा 70 माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थित संपन्न झाला असताना आपण शिकलेल्या जि.प.शाळेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना मदत करण्याचा दृष्टीकोन पुढे आला आणि ग्रामीण भागातील गरजू मुलांना मदत झाली.
या कार्यक्रमासाठी सचिन सोनवणे,सुभाष चव्हाण, पद्माकर सोनवणे, विशाल शिवणकर, विनायक जगताप या माजी विध्यार्थ्यानी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. न्हावी केंद्रातील गुणंद, टापरेवाडी, हिंगे वाठार, न्हावी,भांबवडे,पैंजळवाडी अशा एकूण 6 शाळातील 150 विध्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी पूनम सोनवणे,सोनाली बोन्द्रे,गीताताई पाटील, उर्मिला भूतकर व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक श्री.अनिल चाचर यांनी केले तर आभार शाळेच्या उपशिक्षिका रुपाली पिसाळ(चाचर)यांनी मानले.


