आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने केले लोणंदचे पालखीतळ चकाचक
लोणंद प्रतिनिधी: दिलीप वाघमारे
श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने आर्ट ऑफ लिव्हिंग टीम खंडाळा यांनी सालाबादप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळावरील दोन टनाहून अधिक कचरा गोळा करून स्वच्छता केली.गेले आठ वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंग खंडाळा टीमच्या वतीने जिल्हा प्रशिक्षक श्री.शिवदास कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 100 हून अधिक स्वयंसेवक माऊलींच्या लोणंद मुक्कामी सेवा बजावत असतात. यावेळी प्रशासनाला मदत म्हणून भाविकांच्या रांगांचे नियोजन देखील रात्रंदिवस केले जाते.
माऊलींच्या लोणंद येथील प्रस्थानानंतर संपूर्ण पालखीतळ हा झाडू खराटे हातात घेऊन स्वच्छ करण्याची सेवा बजावत असते.आज देखील संपूर्ण टीमने पालखीतळ साफ करून चकाचक केला.यासाठी लोणंद नगरपंचायतीने त्यांना सहकार्य केले.
या स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या स्वयंसेवकांसाठी रयत बॅच 1993-95 यांनी जेवणाची व्यवस्था केली होती.
यावेळी युवाचार्य कदम मॅडम,युवराज गाढवे,
हभप ॲड.गजेंद्र मुसळे,नितीन जानकर,धुळा कराडे,उमेश कदम,विशाल क्षीरसागर,मोहित पवार,सचिन पोळ,ॲड.शुभांगी कराडे, सारिका पिंगळे,भक्ती भोसले,सोनवणे मॅडम,महादेव धायगुडे,आनंदा नरुटे,अनिकेत कदम,ॲड.गणेश धायगुडे,प्रशांत भोसले, शेळके,राहुल शेळके,मिलिंद धायगुडे आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी नगरपंचायत अधीक्षक नाना शेळके,स्वच्छता विभाग प्रमुख सदाभाऊ शेळके,रयत बॅच 1993 चे सदस्य अमोल ठोंबरे,शकील इनामदार,गोट्या जाधव व त्यांचे सहकारी उपस्थित होते.


