धर्मस्थळे मंदिर मज्जीद यांना पोलीस संरक्षण द्या.! जिल्हाधिकारी सातारा
उप संपादक: दिलीप वाघमारे
हिंदू-मुस्लीम शीख साई पारसी जैन बौद्ध इत्यादी धर्म बांधव या देशांमध्ये गुण्यागोविंदाने भारतीय संविधानाच्या जीवावरती नांदत आहेत परंतु काही दहशतवादी संघटनांनी कायद्याला न जुमानता अल्पसंख्याकांच्या धर्मस्थळावरती हल्ले करून त्यांना टार्गेट करण्याचे काम सुरू केलेले आहे त्यामध्ये मुस्लिम समाज मात्र प्रामुख्याने कोरफळला जात आहे म्हणूनच धर्मस्थळे मंदिर मस्जिद यांना पोलीस संरक्षण द्यावे तसेच धर्माच्या नावावरती तोडफोड दहशतवाद करणाऱ्यांवरती दरोड्यासारखे गुन्हे दाखल करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आत्मक्लेष आंदोलन करत आहोत सर्व धर्माचे लोक बंधुभाव व मित्रत्व जपत गेली बहात्तर वर्ष गुण्यागोविंदाने वावरत आहेत परंतु मागील पाच वर्षापासून हिटलरशाही दडपशाही यांनी उत आणलेला आहे गुण्यागोविंदाने राहणारे सर्व धर्मातील लोक मित्रत्व जपत असताना काही मित्रातीलच एक समुदायाला मात्र परकेपणाची जाणीव होऊ लागली आहे अशावेळी भयभीत झालेल्या मुस्लिम समाजाला हा देश आपला आहे व मी या देशाचा नागरिक आहे आम्ही या देशाचे नागरिक आहेत त्याची जाणीव करून देण्याकरता सामाजिक सलोखा रॅली करत आहोत एकंदरच ज्या लोकांनी जाणीवपूर्वक मुस्लिम लोक वस्त्या व मुस्लिम धर्मस्थळे उध्वस्त करण्याचा घाट घातलेला आहे अशे समाजकंटक शोधून कडक कारवाई करण्यात यावी संबंधितांवर दरोडा मोका सारखे गुन्हे दाखल करण्यात यावी तसेच हिंदू मुस्लिमांमध्ये दुहीची बीजे पेरणार्यावर सुत्रधार शाधून त्यावर कडक कारवाई करण्यात यावी व उध्वस्त झालेल्या मुस्लिम बांधवांचे पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल


