ससेवाडी येथील गुरुदत्त सीएनसी कंपनीमध्ये अज्ञात चोरट्याने तब्बल २३६१९० रुपयांची केबल चोरी
ससेवाडी ता. भोर जि.पुणे येथील गुरुदत्त सीएनसी कंपनीमध्ये केबल चोरी केली आहे. तब्बल दोन लाख छत्तीस हजार एकशे नव्वद रुपये किमतीची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत प्रवीण चंद्रकांत जगताप वय ४८ वर्ष रा. कर्वेनगर पुणे यांनी याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससेवाडी ता. भोर जि. पुणे येथील जमीन गट क्र. २९ मधील गुरुदत्त सीएनसी कंपनीमध्ये दि. १६ रोजी रात्री १२:३० ते २:३० दरम्यान कंपनीच्या स्टोर रूमच्या दक्षिण बाजूचे खिडकीचे ग्रील कापून स्टोअर मध्ये प्रवेश करून १२ केबल चे नवीन बंडल, २३६१९० रुपये किमतीची केबल अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्याकरिता चोरून नेले.
म्हणून प्रवीण जगताप यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


