हिमालय फौंडेशन कडून पोलिसांना मास्क वाटप.
लोणंद प्रतिनिधी : दिलीप वाघमारे
सातारा जिल्हा पोलीस प्रशासन तसेच लोणंद लोणंद पोलीस प्रशासन दिवसरात्र अविरत काम करत आहेत . कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व उपयुक्त गोष्टी करत आहेत . त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हिमालय फौंडेशन तर्फे प्रति वर्षी प्रमाणे काल ३५० व आज २०० मास्क वाटप करण्यात आले . तसेच DySP शेंडगे मॅडम यांचे कडे सहा प्रथोमपचार किट ज्या मध्ये बँडेज मास्क तापाची पित्ताची उलटीची गोळी तसेच खोकल्या साठी असणारा अडूळसा ‘ जखमेची पावडर क्रिम जुलाब गोळी इ . असणारे परीपुर्ण किट देण्यात आले . स्थानिक लोणंद पोलीस स्टेशनचे सुशिल भोसले साहेब यांच्या सुचने नुसार योग्य पद्धतीने प्रथोमपचार किट बनवण्यात आले . या प्रसंगी हिमालय फौंडेशन चे सचिव जाविद पटेल , अध्यक्षा डॉ माधुरी जाधव ,जयंत कुलकर्णी डॉ दिपेन्द्र कोकरे , मोहम्मद मुल्ला सत्यजीत शानबाग , डॉ प्रज्ञेश गोरड ‘ नवाब चौधरी इ सदस्य व नागरीक उपस्थित होते . पोलीस प्रशासनाने दिलेल्या मास्क व प्रथोमपचार किट बद्दल हिमालय फोंडेशन चे आभार मानले


