खेडशिवापूर टोल नाक्यावर शेतकरी, अपंग व दिव्यांग हक्कांसाठी प्रहार संघटनांचं जोरदार आंदोलन!  ७/१२ कोरा, कर्जमाफी व दिव्यांगांना मानधनाची मागणी; प्रशासनास निवेदन


मंगेश पवार

दि. 24 भोर (प्रतिनिधी) –शेतकरी, दिव्यांग व अपंग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने खेडशिवापूर टोल नाक्यावर आज भव्य आणि शिस्तबद्ध आंदोलन करण्यात आलं.

७/१२ उतारा कोरा करणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तसेच दिव्यांग व अपंग नागरिकांना दरमहा ₹६,००० मानधन मिळावं, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आलं.

प्रमुख मागण्या:

दिव्यांग व अपंगांना मासिक ₹६,००० मानधन द्यावे

शेतकऱ्यांचे ७/१२ उतारे कोरे करावेत

संपूर्ण कर्जमाफी तात्काळ लागू करावी

अपंगांसाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी

प्रमुख उपस्थिती व नेतृत्व:

या आंदोलनात खालील नेत्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि मार्गदर्शन केलं:

नामदेव वालगुडे – अध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटना, वेल्हा

ADVERTISEMENT

बापू कुडले – प्रहार अपंग क्रांती संघटना, भोर

अजय कांबळे – अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, भोर

आदित्य बोरगे – जिल्हा प्रमुख युवा संघटक, पुणे (शिवसेना – उ. बा. ठा.)

किशोर अमोलिक- भोर विधानसभा अध्यक्ष रिपब्लिकन सेना

वनिता महाडिक – अध्यक्ष, महिला प्रहार अपंग क्रांती संघटना, भोर

मनीषा गायकवाड – अध्यक्ष, महिला प्रहार अपंग क्रांती संघटना, वेल्हा

 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाला निवेदन दिलं असून, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आंदोलन शांततामय पद्धतीने पार पडले असून, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  राजेश गवळी यांसह अधिकाऱ्यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार संघटनेकडून मानण्यात आले.

 

जर लवकरच ह्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!