पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारांच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या, वाकड पोलिसांची कामगिरी,
संभाजी पुरीगोसावी : प्रतिनिधी.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक संशयित इसम बेकायदेशीरपणे पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारांला वाकड पोलिसांनी बड्या ठोकल्या आहेत, ही कारवाई शनिवारी सायंकाळी पावणे आठ वाजता काळेवाडी येथे करण्यात आली आहे, ( विजय राहुल तलवारे (वय 22 ) रा. काळेवाडी ) असे या सराईत गुन्हेगारांचे नाव आहे, वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रात्रीच्या सुमारांस परिसरांत पेट्रोलिंग करीत असताना काळेवाडी येथे त्यांना विजय तलवारे हा दिसला तो सराईत गुन्हेगार आहे, तो एका गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवाच होता, मात्र गुन्हा झाल्यानंतर पसार झाला होता, त्यामुळे त्याला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पोलीस दिसण्याचे पाहून पळून जाऊ लागला अखेर वाकड पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यांत घेतले असता, यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आली, पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.


