गणेश विसर्जनासाठी 6 हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त:- सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार :- पोलीस आयुक्त अमितेशकुमार.
संभाजी पुरीगोसावी : प्रतिनिधी .
पुणे शहरांतील गणेश उत्सवाला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात मानाचे पाच गणपती दगडूशेठ,हलवाई गणपती भाऊ रंगारी गणपती आणि हलवाई गणपती भाऊ रंगारी गणपती आणि गणपती मंडळे व त्यांचे सजीव देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण पुण्यनगरीत येत असतात, पुण्यातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे, सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीने श्री. गणेशाची विसर्जन मिरवणूक काढली जाते, दरम्यान 17 तारखेला विसर्जन मिरवणूक होणार आहेत यासाठी आता पुणे पोलीस देखील सज्ज झाले आहे, विसर्जन मिरवणुकीत पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळणार आहे, पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (दि.17 ) सप्टेंबर रोजी दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे, त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे, विसर्जन सोहळ्यासाठी जवळपास 6 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे, विसर्जन मार्गावर सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याची देखील करडी नजर राहणार आहे, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरून मिरवणुका जाणार आहेत, मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरांत देखील मोठा पोलीस फौजफाटा तैनात असणार आहे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार तसेच सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली या बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.


