पाटण रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांची कारवाई :- चौकाने घेतला अखेर मोकळा श्वांस,
संभाजी पुरीगोसावी: प्रतिनिधी.
कराड नजीक पाटण तिकाटणे येथे रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता त्या अनुषंगाने वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत स्वतः पुढाकार घेवुन अतिक्रमण हटवून अखेर वाहतुकीला शिस्त लावली, पोलिसांच्या कारवाईमुळे पाटण तिकाटणे या चौकाने अखेर मोकळा श्वांस घेतला आहे, पाटण तिकाटणे या परिसरांतील उड्डाण पुलाखाली अनेक विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत, अनेक दुकानही मध्यावरच होती, त्यामुळे वाहतुकीला चांगलाच अडथळा निर्माण होत होता, तसेच वाहनावरील ताबा सुटल्यास ते वाहन व्यवसायिकांच्या दुकानावर जावुन अपघाताची शक्यता होती, त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर यांच्याशी चर्चा करून वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संतोष जगदाळे सहायक फौजदार संजय चव्हाण पोलीस शिपाई नवनाथ पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच पाटण-तिकाटणे येथे कारवाईला सुरुवात केली होती, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे अखेर पाटण रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली आणि पाटण तिकाटणे या चौकात अखेर मोकळा श्वांस घेतला आहे,*


